Nashik Kumbh Mela : तपोवनातील झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाचा तूर्तास नकार

नाशिक कुंभमेळा: माहिती सादर करण्याचे प्रशासनाला आदेश
Bombay High Court
Bombay High CourtPudhari
Published on
Updated on

मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली.

मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व नायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने रस्त्याच्या मधोमध असलेल्या सुमारे २ हजार झाडांचे नेमके वय काय आणि त्यांची अचूक संख्या किती, याबाबतची सविस्तर माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश , देत झाडे तोडण्यास तात्काळ परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावली.

Bombay High Court
Mumbai Ganeshotsav : विसर्जनासाठी पालिकेचा यंदा जुनाच कंत्राटदार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधुसंतांच्या व्यवस्थेसाठी तपोवन भागात साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे अठराशे झाडे तोडली जाणार असल्याने स्थानिक पर्यावरणवाद्यांनी याला तीव्र विरोध करीत मधुकर जगताप यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

या प्रकरणाशी संबंधित अर्ज राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल आहे. या प्रकरणाचे हस्तांतरण करण्यासाठी नाशिक महापालिकेनेही स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. रस्त्याच्या हद्दीत येणाऱ्या तसेच रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत असलेल्या झाडांबाबत वृक्षतोडीवरील स्थगिती न्यायालयाने हटवावी अशी मागणी प्रशासनाने केली. त्यावर खंडपीठाने झाडांच्या वयाची विचारणा केली.

Bombay High Court
Mumbai High Court : मैदानेच उरणार नसतील तर लोकांनी मैदानी खेळ खेळायचे कुठे?

बहुतांश झाडे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची तर काही झाडे ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाची असून त्यांची पुनर्लागवड केली जाईल, असे प्रशासन म्हणाले. दोन्ही बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याचे सांगत खंडपीठाने सुनावणी ८ सप्टेंबर पर्यंत तहकूब केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news