Municipal Corporation Election pudhari news
मुंबई

Municipal Corporation Election: राज्यातील सर्वच महापालिकेचे बिगुल वाजले, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल

कोणतेही नाव डिलीट किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही.

Anirudha Sankpal

Maharashtra Election Commission Press Conference: राज्य निवडणूक आयोगाची आज ( दि. १५ डिसेंबर) बहूप्रतिक्षित पत्रकार परिषद सह्याद्री अतिथी गृह इथं झाली. अनेक वर्षांपासून महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा अखेर जीव भांड्यात पडला आहे. राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुका या १५ - १ - २०२६ तारखेला होणार असून या निवडणुकांचे निकाल हे १६ - १ - २०२६ दिवशी लागणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली.

राज्यातील २८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. १४४२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आजपासून २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. २७ नगर पालिकांची मुदत संपली होती. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन नगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत. २८ बहूसदस्यीय तर बृह्नमुंबई महापालिका ही एक सदस्यीय निवडणूक असणार आहे.

काय म्हणाले निवडणूक आयुक्त

  • निवडणूक इव्हीएम मशीनवरच घेण्यात येणार आहे.

  • अर्ज स्विकारणे २३ ते ३० डिसेंबर २०२५

  • अर्ज छाननी ३१ डिसेंबर २०२५

  • उमेदवार माघारीची मुदत २ जानेवारी २०२६

  • अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६

  • मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६

  • मतमोजणी १६ जानेवारी २०२६

  • ऑफलाईनच अर्ज दाखल करायचे आहेत.

  • जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाण पत्र सादर करावी लागणार आहे.

  • सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर कारावं लागणार आहे.

  • ३ कोटी ७८ लाख एकूण मतदार

  • स्त्री - १ कोटी ६६ लाख

  • १ जुलै २०२५ ची अधिसूचित मतदार यादी वापरणार

  • भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी आहे

  • कोणतेही नाव डिलीट किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही

  • मुंबई महानगरपालिका निडणुकीसाठी १० हजार मतदान केंद्रे

  • राज्यातील २८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

  • १४४२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत.

  • मुंबई महापालिका मध्ये ११ लाख पेक्षा जास्त दुबार मतदार आढळून आले आहे

राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. मात्र आरक्षण मर्यादा आलोंडल्यामुळं काही नगरपालिका अन् नगर परिषदांचे मतदान ऐत्यावेळी पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ३ मे रोजी लागणारा निकाल देखील २२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावा असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता.

नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरच महानगर पालिका निवडणुका कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. त्यातच राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरला पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा होती. त्या प्रमाणे आज १५ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT