mumbra drum murder case: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक ड्रम कांड घडलं होतं. ते ड्रम कांड अख्खा देशभरात गाजलं. मुस्कान नावाच्या एका महिलेनं आपल्या प्रेमीसोबत मिळून पतीची हत्या करून त्याला सिमेंटमध्ये भरलेल्या ड्रममध्ये पुरलं होतं.
आता असाच काहींसा प्रकार मुंबईत देखील झाला आहे. मुंबईतील मुंब्रा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मेरठ आणि मुंब्रामधील या घटनेत फरक इतकाच आहे की इथं पती ऐवजी प्रेमी ड्रममध्ये गेला आहे. एका महिलेने आपला पती आणि भावासोबत मिळून हा भायनक कट रचला. आधी महिलेच्या प्रेमीला मारलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह हिरव्या रंगांच्या ट्रममध्ये बंद करून तो ड्रम नाल्यात टाकून दिला.
या धक्कादायक प्रकरणाची सुरूवात ही एका मिसिंग कम्प्लेंटने सुरू झाली. मुंब्रामध्ये राहणाऱ्या अरबाज कमसूद अली खान यांना एक दिवस दादरला जाऊन येण्याचे घरच्यांना सांगितले होते. मात्र अरबाज बराच काळ घरी परतलाच नाही. त्यानंतर कुटुंबीय चिंतेच आले होते.
त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली. खूप तपास केल्यानंतरही अरबाजचा काही पत्ता लागला नाही. त्यावेळी त्यांनी मुंब्रा पोलीसात मसिंगची तक्रार दाखल केली.
मुंब्रा पोलीसांनी ज्यावेळी या प्रकरणाची एक एक कडी जोडण्यास सुरू केली त्यावेळी वेगळेच चित्र समोर आलं. पोलिसांनी अरबाजच्या मोबाईल कॉल डिटेल्स आणि लास्ट लोकेशन याचा तपास घेतला. त्यावेळी अरबाजचे शेवटचे लोकेशन वर्सोवा भागात दाखवले. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी त्याची प्रेमिका मेहजबीन शेख हिचे मोबाईल लोकेशन देखील तिथलेच दाखवत होते.
पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यानंतर पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान मेहजबीनने पहिल्यांदा पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिनं अखेर सत्य पोटातून ओठावर आणलं. मेहजबीनने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाच धक्का बसला.
मेहजबीन यांनी एका कटाअंतर्गत अरबाजला संपवल्याचं मान्य केलं. तिने पती हसन आणि भाऊ तारिक शेख यांच्या साथीने अरबाजकडून मोठी रक्कम वसूल करण्यासाठी आणि त्याला आपल्या वाटेतून हटवण्यासाठी कट रचल्याचं सांगितलं. कटानुसार अरबादला पैशाच्या बहाण्याने वर्सोवामध्ये बोलवण्यात आळं. मात्र तिथं पैसे मिळाले नाहीत म्हणून आरोपींनी क्रूरपणे अरबाजला संपवलं.
अरबाजचे हात पाय बांधून त्याला प्लास्टिकच्या जाड पाईपने जोपर्यंत त्याचा श्वास थांबत नाही तोपर्यंत मारहाण करण्यात आली. अरबाजची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह एका मोठ्या हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये घालून मुंब्राच्या एका निर्जन नाल्यात फेकून दिला.
मुंब्रा पोलिसांची त्वरित कारवाई आणि तांत्रिक तपासामुळे या गुन्ह्याचा परदाफाश झाला. पोलिसांनी नाल्यातून मृतदेह मिळवला असून आरोपी प्रेमिका मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना अटक करण्यात आली आहे.
मात्र या गुन्ह्यातील आरोपी मेहजबीन हिचा पती हसन आणि त्याचा अजून एका साथीदार मुजम्मल पठाण अजूनही फरार आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरूद्ध हत्या, अपहरण, गुन्हेगारी कट आणि पुरावे नष्ट करण्यासारखे गंभीर कलमे लावली आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे.