Mumbai Water Metro Project Pudhari
मुंबई

Mumbai Water Metro Project: मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो प्रकल्पाची तयारी; कोची मेट्रोची सल्लागार म्हणून नियुक्ती

सागरमाला 2.0 अंतर्गत 21 ठिकाणांची निवड; 60:40 केंद्र-राज्य निधीतून जलवाहतुकीला चालना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कोची जल मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. कोची मेट्रो लि. ने तयार केलेल्या फिजीबिलीटी अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, मुंबईच्या जलमेट्रो प्रकल्पासाठी कोची रेल लि. याच कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही संस्था प्रस्तावित जलवाहतुकीच्या दृष्टीने, वाहतूक अभ्यास, पायुभूत सुविधा, नौकानयनविषयक बाबी, कनेकटीव्हिटी, जलयान, जलवाहतुकीचे कार्यचालन व व्यवस्थापन, खर्चाची अंदाजपत्रके, अंमलबजावणीचा आराखडा यांचा अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे नौकानयन सल्लागार व मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण खरा यांनी खा. रवींद्र वायकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रानुसार, सागरमाला योजना 2.0 अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो प्रकल्प सुरु करण्याची योजना आहे. यात 60 टक्के केंद्र सरकार व 40 टक्के राज्य सरकार निधीची गुंतवणूक करेल.

मुंबई व आसपासच्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईंदर या शहरांभोवती असलेल्या जलमार्गाचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरु करण्याबरोबरच प्रवासी वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल लि. यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ऑगस्ट 2025 मध्ये फिजीबिलीटी अहवाल सरकारला सदर केला. यात जलवाहतुकीसाठी 21 ठिकाणे निवडण्यात आली आहेत. 10 नवीन जलमार्गावर जलवाहतूक सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. याचा सविस्तर प्रकल्प आहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रो रेल लि. यांची सल्लागार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT