Mumbai Work Shifts
मुंबई : प्रत्येकाने सकाळी सकाळी उठून ऑफिसला पोहोचलेच पाहिजे का? या प्रश्नातून लोकलचा सकाळचा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील कार्यालयांच्या वेळा दोन शिफ्टमध्ये करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने ठेवला. मात्र, अशा वेळा बदलण्यास फक्त दहा संस्था तयार झाल्या आणि लोकल प्रवाशांमध्ये सर्वाधिक कर्मचारी असलेल्या राज्य सरकारने व महानगरपालिकेने मौन पाळले. परिणामी, जिवाशी खेळ करीत चाकरमान्यांचा लोकल प्रवास खचाखच गर्दीतून रोज सुरू आहे.
लोकलमध्ये लोंबकळणाऱ्या प्रवाशांची संख्या सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात असते. पहाटे चारपासून सुटणाऱ्या रेल्वेमधून चार-चार तास प्रवास करून कसारा, खोपोली, पनवेल या भागातून नोकरदार येत असतात. अपुऱ्या पडत असलेल्या रेल्वेमुळे अनेकदा महिला प्रवाशांनाही लोंबकळत प्रवास करावा लागतो. प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि अपुऱ्या ठरणाऱ्या रेल्वे गाड्या या अपघातांचे मुख्य कारण आहे.
यावर उपाय म्हणून उपनगरीय लोकलची सकाळ-संध्याकाळची पीक अवरमधील एकाच दिशेची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या कार्यालयांचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू केले. या प्रयोगाला फक्त मुख्य टपाल कार्यालयानेच (जीपीओ) सहमती दर्शविली. राज्य शासन आणि महापालिकेसह अन्य सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी अशा ५०० पेक्षा जास्त आस्थापनांनी मरेने पाठवलेल्या प्रस्तावावर मौन धारण केले. राज्याच्या प्रमुख सचिवांपासून मुंबई पोलिस आयुक्तालय, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून हा प्रयोग स्वीकारण्याची विनंती केली, मात्र त्यास प्रतिसाद नाही.
मध्य रेल्वेवर दररोज ३५ ते ३६ लाख प्रवासी प्रवास करतात. मर्यादित लोकल संख्येमुळे गर्दी वाढत आहे. वाढत्या गर्दीवर उतारा म्हणून मुंबईतील विविध आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांच्या वेळा बदलाव्यात याकरिता, मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापकांनी जुलै २००८ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे महानगरातील कार्यालयांच्या वेळा बदलणे, सुट्ट्यांचे नियोजन करणे आणि प्रवासीभिमुख सुविधा यांबाबत प्रवासी संघटनांसोबत चर्चा केली होती. मात्र, महानगरातील कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
लोकलची संख्या वाढविण्यास मर्यादा आहेत. विशिष्ट वेळेतील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलणे, हा चांगला पर्याय ठरू शकतो. कार्यालयांनी वेळा बदलल्याने लोकल रिकाम्या धावतील असे नाही. परंतु गर्दी काही प्रमाणात विभागली जाऊ शकते.