मुंबई

मुंबई: कामगार कल्याण मंडळाच्या उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या १५० कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उन्हामुळे आज (दि.२६) एका उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष दिनेश शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची आज भेट घेतली. त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून समस्या सोडवण्याची ग्वाही यावेळी शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख दिलीप नाईक, दीपक पवार, रूपेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT