Second Marine Drive
मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांत समुद्राच्या लाटा अंगावर घेत केले जाणारे पर्यटन किंवा जॉगिंग आतापर्यंत केवळ मरिन ड्राइव्ह परिसरात दिसत होत्या. आता लवकरच मुंबईकरांना आणखी एक मरिन ड्राइव्ह मिळणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळीपर्यंत विशिष्ट मार्गिका उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण 15 जूनला होण्याची शक्यता आहे.
ब्रीच कॅण्डी येथील प्रियदर्शनी पार्क ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळी टोक या 7.5 किमी मार्गावर हे नवीन मरिन ड्राइव्ह असेल. दर 400 मीटरवर एक अशाप्रकारे 20 भुयारी मार्गिका यात असतील. याद्वारे समुद्राच्या दिशेला आणि त्याच्या विरूद्ध बाजूला जाता येईल. 12 हेक्टरचा हा परिसर पालिकेने विकसित केला आहे. सागरी किनारा मार्गालगत 70 हेक्टर मोकळी जागा निर्माण करण्याच्या प्रकल्पाचा भाग म्हणून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
मरिन ड्राइव्हला पर्यटकांची गर्दी वाढते आहे. दुसर्या बाजूला विविध पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यांमुळे मुंबईतील मोकळ्या जागा कमी होत आहेत. अशावेळी मुंबईकरांना जास्तीत जास्त मोकळ्या जागांचा पर्याय मिळावा या उद्देशाने सागरी किनारा मार्गालगत ही विशिष्ट मार्गिका उभारली जात आहे.
* या मार्गिकेत 70 टक्के हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे.
* 30 टक्के भागात पायवाट, जॉगिंग ट्रॅक, सायकल मार्गिका असणार आहे.
* पर्यटकांना बसण्यासाठीही वैशिष्ट्यपूर्ण जागा करण्यात येणार आहेत.