Mumbai Rain Pudhari
मुंबई

Mumbai Rain: मुंबईत पुन्हा पावसाची एंट्री! रिमझिम सरींमुळे वाहतूक मंदावली, शहराला गारवा

मुंबई पूर्णपणे विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहर व उपनगरात शनिवारी पावसाळी वातावरण होते. तर ठिकठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. दिवसभरात शहरात १२ मिमी, पूर्व उपनगरात १६ मिमी तर पश्चिम उपनगरात २० मिमी पावसाची नोंद झाली. रस्त्यावरील वाहतूकही मंदावली होती. पश्चिम व मध्य रेल्वेची लोकल सेवा मात्र वेळापत्रकानुसार सुरू होती.

मुंबई पूर्णपणे विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात कडक उन्हामुळे उखाड्यामध्येही वाढ झाली होती. परंतु शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.

पावसाचा फारसा जोर नसला तरी ठिकठिकाणी रिमझिम सुरू होती. अनेक भागात रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावला होता. सायंकाळी दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईतील वरळी, दादर, परळ, माहीम, सायन, धारावी आदी भागात वाहतूक कोंडी झाली होती.

पश्चिम व पूर्व उपनगरातील रस्त्यावरही काही प्रमाणात वाहतूक कोणती होती. नेहमीप्रमाणे पश्चिम द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडी अडकला होता. दिवसभरात २५ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. तर चार ठिकाणी किरकोळ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

दोन ठिकाणी भिंतींची पडझड झाली होती मात्र यात कोणालाही मार लागला नाही. मुंबई शहर व उपनगरात एकूण वार्षिक पावसाच्या तुलनेत ६२.४० टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक १,४७१ मिमी पाऊस पश्चिम उपनगरात झाला. तर पूर्व उपनगरात १,४६३ मिमी व शहर विभागात १,२५० मिमी पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT