Railway Track Pudhari
मुंबई

Mumbai October heat: मुंबई लोकललाही ऑक्टोबर हिटचा तडाखा, रूळ प्रसरण पावल्याने आपत्कालीन ब्लॉक घेण्याची वेळ

Central Railway emergency block : आपत्कालीन ब्लॉक घेण्याची रेल्वेवर वेळ

पुढारी वृत्तसेवा

Central Railway emergency block October heat

मुंबई : वाढत्या ऑक्टोबर हीटचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर सुद्धा दिसू लागला आहे. अतिउष्णतेमुळे काही ठिकाणी रेल्वेचे रूळ प्रसरण पाऊ लागले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी मध्य रेल्वेवर मंगळवारी मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईनवरील तीन रेल्वे स्थानकात आपत्कालीन ब्लॉक घेण्याची वेळ आली.

साधारण १० ते १५ मिनिटांचे हे आपत्कालीन ब्लॉक होते. मात्र, त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर झाल्याने काही फेऱ्या मध्य रेल्वेला रद्द करणे भाग पडले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमान वाढू लागले आहे. दुपारनंतर उष्णतेमुळे जमिनीचे तापमान कमालीचे वाढत आहे. त्यामुळे मुंबईभर पसरलेल्या रेल्वे रुळांवर या उष्णतेचा परिणाम दिसू लागला आहे. रुळ प्रसरण पावण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी रेल्वेकडून आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आले.

परे,दिवा, दिघा स्थानकांत ब्लॉक

सर्वात पहिला ब्लॉक परळ रेल्वे स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर दुपारी १२.३० ते १२.४० ( १० मिनिटांचा ) व दुपारी १.०५ ते १.१५ ( २० मिनिटांचा ) या वेळेत ब्लाॅक घेण्यात आला. दिवा स्थानकात डाऊन धीमा मार्गावरच दुपारी १.३८ ते १.५३ या वेळेत ( १५ मिनिटांचा ) ब्लॉक घेण्यात आला आणि दिघा स्थानकात दुपारी २.०९ ते २.२५ असा ( १५ मिनिटाचा ) ब्लॉक घेण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT