Mumbai Air Pollution Pudhari
मुंबई

Mumbai Air Pollution: ऑक्टोबर हिटने मुंबईकर हैराण, त्यात धुळीची भर! धूळ रोखण्यासाठी कोट्यवधींचा पाण्याचा मारा

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेची धावपळ; मुंबईचे ३७७ रस्ते रोज पाण्याने धुतले जाणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत ऑक्टोबर हिट सुरु असताना, धूळीचे साम्राज्य पुन्हा वाढलेले आहे. यामुळे वायू प्रदुषणाची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता पुन्हा एकदा पाण्याने रस्ते धुण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी प्रशासनाने परिमंडळ स्तरीय टॅंकरसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवणे तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे यामध्ये समतोल साधण्याच्या उद्देशाने, मुंबईतील वाढते वायू व धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई शहरात बांधकाम व पायाभूत सुविधा प्रकल्पांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यांपैकी बहुतांश प्रकल्प है पुनर्विकासाशी संबंधित आहेत. याशिवाय, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन तसेच पारंपरिक इंधनांचा वापर यांसारख्या विविध स्रोतांमुळे वायू प्रदूषणात वाढ होत असून, त्यातून पर्यावरणीय आव्हाने निर्माण होत आहेत.

उच्च दाबाच्या पाण्याद्वारे नियमित स्वच्छता

धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी सार्वजनिक रस्त्यांची उच्च दाबाच्या पाण्याद्वारे नियमित स्वच्छता याला प्राधान्य दिले जाते. मुंबईतील एकूण सुमारे ६७७ कि.मी. लांबीचे ३७७ सार्वजनिक रस्ते या स्वच्छतेसाठी निश्चित केले आहेत.

या रस्त्यांची दररोज पाण्याद्वारे स्वच्छता केली जाणार असून, त्यासाठी २ हजार, ५, हजार लिटर व १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात येणार आहे. रस्ते नियमित धुतल्यामुळे प्रदूषणाला आळा बसून मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा यापुढे सामना करावा लागणार नाही.

भाडेतत्वावरील २ हजार, ५ हजार व १० हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकरची वाहन सेवांसाठी नियुक्त कंत्राटदार

परिमंडळ - १ : में इन्फ्रा ट्रान्नाप्रोजेक्ट (८४.५१लाख रुपये)

परिमंडळ २ : मे. के. सास असोसिएट्स (७२.२५ लाख रुपये)

परिमंडळ ३ : मे. श्री माऊली एंटरप्रायझेस (९२.८८ लाख रुपये)

परिमंडळ – ४ : मे. अंशुमान अँड कंपनी(२.२१ कोटी रुपये)

परिमंडळ ५ : मे. दीपक अँड सन्स ट्रान्सकॉन एलएलपी(१.०९ कोटी रुपये)

परिमंडळ ६ : मे. अंशुमान अँड कंपनी(१.०३ कोटी रुपये)

परिमंडळ ७ : मे. आरती कॉर्पोरेशन (१.०८ रुपये)

टँकरचे सात परिमंडळांमध्ये वर्गीकरण

सेवा पुरवठादारांच्या देखरेखीसाठी, नियंत्रणासाठी २६ प्रभागांमध्ये तैनात करण्यात येणाऱ्या टँकरचे सात परिमंडळांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. रस्ते धुण्यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर १५० दिवसांसाठी (पावसाळा वगळून) भाडेतत्त्वावर सात परिमंडळांसाठी सेवा घेतली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT