मुंबई : नरेश कदम
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेना(शिंदे गट ) विरुद्ध सेना ( ठाकरे बंधू ) यांच्यात 87 जागांवर परस्परांच्या विरोधात ठाकले असतानाच, मुंबईतील 25 मुस्लिमबहुल प्रभागांत काँग्रेस, सपा, एमआयएम आणि अजित पवार गट, उद्धव गट यांच्यात बहुरंगी लढती रंगणार आहेत. जर ठाकरे बंधूंनी 90 पेक्षा जास्त जागा जिंकल्या, तर या 25 जागांवर जिंकेल त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.
काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांचा मुलगा हैदर शेख हा मालाडच्या प्रभाग 34 मधून लढत असून या प्रभागात उद्धव ठाकरे गट आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत. मालाड पश्चिमच्या प्रभाग 48 मध्ये काँग्रेसचे रफीक शेख यांच्या विरोधात सपा, अजित पवार गट, शरद पवार गट यांचे उमेदवार रिंगणात आहेत.
अंधेरीच्या प्रभाग 66 मध्ये काँग्रेसचे मेहेर हैदर यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गट, अजित पवार गट यांच्यात लढत आहे.
वांद्रे येथील प्रभाग 96 मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या साना खान रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेस, सपा आणि अजित पवार गटाचे उमेदवार उभे आहेत.
घाटकोपरच्या प्रभाग 124 मध्ये ठाकरे गटाच्या सकिना शेख यांच्याविरोधात एमआयएम, अजित पवार गट यांची लढत आहे. शिवाजी नगरच्या 136 मध्ये काँग्रेसचे साहेबे अलम यांची विरुद्ध ठाकरे गट, एमआयएम यांचे उमेदवार रिंगणात आहेत.शिवाजी नगर 138 मध्ये काँग्रेस, ठाकरे गट, सपा, एमआयएम यांच्यात लढत आहे.
प्रभाग 145 मध्ये काँग्रेस, ठाकरे गट, अजित पवार गट, एमआयएम अशी चौरंगी लढत होत आहे.
चांदिवली प्रभाग 161मध्ये काँग्रेस, ठाकरे गट, एमआयएम, सपा अशी चौरंगी लढत होत आहे.चांदिवली 162 मध्ये काँग्रेस, ठाकरे गट,अजित पवार गट, आप असा सामना आहे. कुर्ला प्रभाग 168 मध्ये काँग्रेस, सपा, ठाकरे गट, अजित पवार गट अशी लढत आहे.
सायन कोळीवाडा प्रभाग 179 मध्ये काँग्रेस,अजित पवार गट, ठाकरे गट, सपा अशी लढत आहे.धारावी 187 मध्ये काँग्रेस, ठाकरे गट आणि अजित पवार गट असा सामना रंगेल. भायखळा 211 मध्ये काँग्रेस, सपा, आप अशी लढत आहे. मुंबादेवी 213 मध्ये काँग्रेस,सपा, ठाकरे गट,आप अशी लढत आहे. मुंबादेवी 223 मध्ये काँग्रेस, सपा, मनसे अशी लढत आहे. कुलाबा 224 मध्ये काँग्रेस आणि सपा असा सामना आहे. त्यामुळे मुस्लिमबहुल भागांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.
2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठी, मुस्लिम आणि दलित मतांच्या समीकरणामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठे यश मिळाले होते. पण महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, सपा हे घटक पक्ष वेगळे लढत आहेत,त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होईल की काय,अशी भीती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला जाणवत आहे.