मुंबई : म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने गुरुवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.  pudhari photo
मुंबई

Municipal workers protest : आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठिय्या

रिक्त पदांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पदोन्नती, पदरचना आणि रिक्त पदे या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सुमारे दोनशे कर्मचारी प्रभादेवीतील एफ/दक्षिण विभागातील कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक दिली. सुमारे अर्धा तास आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रलंबीत मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने आंदोलन केले.

सार्वजनिक आरोग्य विभागात 859 पैकी सुमारे 40 टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने देण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. यानंतर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत पदोन्नतीच्या प्रस्तावावर महापालिका उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांची सही झाली आहे.

पुढील आठवड्यात उप आयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्यासमवेत बैठक घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, पदरचनेबाबत प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. स्वच्छता निरीक्षक पदांबाबत एकूण 67 पैकी 52 कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित 15 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पदोन्नती समितीशी चर्चा करून पात्र कर्मचाऱ्यांना आदेश देण्याची कार्यवाही केली जाईल, असही आश्वासन देण्यात आले. यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घण्यात आले.

बैठकीला उप कार्यकारी

आरोग्य अधिकारी (मुख्यालय) डॉ. प्रकाश वल्लेपवार, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी संगीता इरप, प्रशासकीय अधिकारी तारी मुख्य लिपीक स्वाती तसेच म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, सहसरचिटणीस प्रदीप नारकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT