BMC  Pudhari Photo
मुंबई

BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी शर्यत रंगली; म्हैसकर आणि मुखर्जी आघाडीवर

भूषण गगराणी ३१ मार्चला निवृत्त; नव्या आयुक्ताबाबत मुख्यमंत्री स्तरावर चर्चेला वेग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेला शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर झालेले कुणाचे प्रेझेंटेशन प्रभावी ठरते यावर मुंबई महानगर पालिकेचा नवा आयुक्त ठरेल असे ताजे संकेत आहेत. यातून आता पालिका आयुक्त पदाच्या स्पर्धेत मिलिंद म्हैसकर आणि संजय मुखर्जी या दोन सनदी अधिकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्चला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव आतापर्यंत आघाडीवर राहिले. मात्र गेल्या दोन दिवसात या पदासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि एमएम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे कळते. मिलिंद म्हैसकर हे फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांच्या कार्यालयाचे प्रधान सचिव होते.

तसेच ते नागपूरचे आहेत. मध्यंतरी फडणवीस यांच्याशी त्यांचे प्रशासकीय मतभेद असल्याची कुजबुज होती. मात्र हे मतभेद नागपूरमधूनच प्रयत्नपूर्वक मिटवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच म्हैसकर यांचे नाव आता मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी पुढे आले आहे.

संजय मुखर्जी तसे सुरुवातीपासून पालिका आयुक्त पदासाठी इच्छुक आहेत. मात्र यांना एमएमआरडीएकडे मुख्यमंत्र्यांचे अनेक ड्रीम प्रकल्प असल्याने एमएमआरडीचे आयुक्त म्हणून त्यांना मुदतवाढ द्यावी असा मुख्यमंत्री कार्यालयाचा विचार प्रबळ झाला तर ते आयुक्तपदाच्या स्पर्धेतून बाजूला होऊ शकतात. असे झाले तर अश्विनी भिडे किंवा म्हैसकर यांच्यापैकी एकाची वर्णी पालिका आयुक्त म्हणून लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT