minor girl assault Trafficking file photo
मुंबई

Mumbai Minor Trafficking: अल्पवयीन मुलीच्या वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना शिक्षा

दिंडोशी विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय; आरोपीला 10 वर्षे, महिलेला 7 वर्षांचा कारावास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करुन तिला ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठविणाऱ्या वेश्यादलाल महिलेसह दोघांना दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयाने कारावास सुनावला. विनय फत्तेबहादूर पाठक व रेणु गणेश मिश्रा अशी दोघांची नावे असून विनयला 10 वर्षांच्या कारावासासह 20 हजारांचा दंड तर रेणूला 7 वर्षांचा कारावास व 1 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

अंधेरी येथे रेणु राहत असून ती घरी सेक्स रॅकेट चालवते. तिच्याकडे असलेल्या एका अल्पवयीन मुलीला विविध ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. यावर 30 मे 2023 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने रेणूच्या घरी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रेणूसह विनय पाठकला ताब्यात घेतले. चौकशीत रेणूच्या सांगण्यावरुन

विनयने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.

याच दरम्यान विनयला न्यायालयाने जामिन मंजूर केला होता तर रेणू ही न्यायालयीन कोठडीत होती. या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत त्यांची कारावासात रवानगी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT