मुंबई : मुंबई महापालिकेने बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 548 कोटी 69 लाख 82 हजार 487 रुपयांची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना अंतिम नोटीस बजावल्यानंतर त्यातील पाच थकबाकीदारांनी 10 कोटी 45 लाखांचा करभरणा केला आहे. तर 11 थकबाकीदारांच्या मालमत्तांंचा लिलाव करण्यात येणार आहे. यात मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल आणि संमिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे.
थकबाकीदार मेसर्स मीनोचर माणिकशॉ गांधी व व्ही.डी. शहा यांच्या नावे असलेली संमिश्र मालमत्ता (थकबाकी रक्कम 2 कोटी 24 लाख 43 हजार 922 रूपये), एफ दक्षिण विभागात लमण रघुनाथ शेट्टी यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम 89 लाख 15 हजार 988 रूपये), एच पश्चिम विभागात भिकाभाई एन उपाध्याय व श्रीराम जे. भट यांच्या नावे असलेली व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी रक्कम 18 कोटी 88 लाख 13 हजार 376 रूपये), पी उत्तर विभागात बच्चुभाई डब्ल्यू डी शॉ ॲण्ड कंपनी यांच्या नावे असलेले व्यावसायिक शेड (थकबाकी रक्कम 3 कोटी 23 लाख 3 हजार 938 रूपये),
पी दक्षिण विभागात मेसर्स अमीर पार्क ॲण्ड ॲम्युझमेंट पार्क यांच्या नावे असलेले हॉटेल (थकबाकी रक्कम 34 कोटी 55 लाख 65 हजार 499 रूपये), ई विभागात जयंत ऑईल मिल यांच्या नावे असलेली तेल गिरणी व गोदाम (थकबाकी रक्कम 01 कोटी 41 लाख 91 हजार 080 रूपये), आर उत्तर विभागात मेसर्स विकयलाल इन्व्हेंस्टमेंट यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम 02 कोटी 41 लाख 79 हजार 329 रूपये), डी विभागातील सरदार सईदना ताहीर सैफुदीन साहेब यांच्या नावे असलेले रूग्णालय (थकबाकी रक्कम 21 कोटी 03 लाख 36 हजार 752 रूपये), डी विभागात सरदार सईदना ताहीर सैफुदीन यांच्या नावे असलेली व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी रक्कम
13 कोटी 47 लाख 86 हजार 245 रूपये), एच पश्चिम विभागात मेसर्स सुमेर असोसिएट्स यांच्या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्कम 188 कोटी 46 लाख 247 रूपये), एस विभागात मेसर्स राजहंस असोसिएट्स यांच्या नावे असलेली व्यावसायिक मालमत्ता (थकबाकी रक्कम 47 कोटी 02 लाख 99 हजार 687 रूपये), आर दक्षिण विभागात जीवनश्रद्धा कॉ - ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्कम 64 लाख 29 हजार 461 रूपये) आणि ई विभागात मेसर्स सुमेर बिल्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे असलेला मोकळा भूखंड (थकबाकी रक्कम 85 कोटी 38 लाख 78 हजार 185 रूपये) आदींचा समावेश आहे.