Mumbai Metro Line 6 project File Photo
मुंबई

Mumbai Metro Line 6 project: मेट्रो-6 मध्ये महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा पूर्ण

मेट्रो-6 ही 14.5 किमीची पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका आहे. यात 13 स्थानके असून कांजूरमार्ग येथे 15.2 हेक्टरवर मेट्रो डेपो उभारण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या 14.5 किमी लांबीच्या मेट्रो-6 प्रकल्पात महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वेच्या कार्यरत मार्गावर अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वाच्या खांबाची उभारणी, तसेच पहिल्या स्टील कॉम्पोझिट स्पॅनची यशस्वी स्थापना करण्यात आली.

मेट्रो-6 ही 14.5 किमीची पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका आहे. यात 13 स्थानके असून कांजूरमार्ग येथे 15.2 हेक्टरवर मेट्रो डेपो उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे 87.7 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. रेल्वेवरील पियर पी127ची उभारणी करण्यात आली. पायाची कामे आणि पियर कॅप स्तरापर्यंतची सर्व कामे रेल्वेच्या सुरक्षा मानकांनुसार आणि मंजूर निकषांनुसार पूर्ण करण्यात आली.

दोन्ही बाजूंनी सतत रेल्वे वाहतूक सुरू असतानाही कोणताही व्यत्यय न आणता हे काम पार पाडण्यात आले. खांब उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर स्टील कॉम्पोझिट गर्डर स्पॅन उभारण्यात आला. त्याची लांबी 42 मीटर आणि वजन सुमारे 168.96 मेट्रिक टन आहे.

ही उभारणी सुमारे 10 तासांच्या नियोजित रेल्वे ब्लॉकमध्ये पूर्ण करण्यात आली. या कामासाठी 500 टन आणि 600 टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा वापर करण्यात आला. जागेच्या मर्यादेमुळे क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT