Mumbai Local Train Megablock Pudhari
मुंबई

Mumbai Megablock 1 March: मुंबईत रविवारी मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील लोकल पाच तास बंद

सीएसएमटी–पनवेल सेवा प्रभावित; मध्य व पश्चिम रेल्वेवरही जम्बो ब्लॉक, प्रवाशांनी पर्यायी नियोजन करावे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे मार्गाच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसह सुरक्षिततेसाठी रविवार 1 मार्चला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सीएसटी-पनवेल हार्बर मार्गावरील लोकल सेवा तब्बल पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी, नेरूळ स्थानकांवरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा आहे.

मध्य रेल्वे

सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक.

सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार व पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

घाटकोपरहून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या लोकल विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. - कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबणार

हार्बर लाईन

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत.

सीएसएमटीहून सकाळी 10.34 ते दुपारी 4.36 पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन लोकल बंद.

पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.

ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय लोकल चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट व मुंबई सेंट्रलदरम्यान 5 तास जम्बो ब्लॉक

सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर धावतील.

चर्चगेटला जाणाऱ्या काही लोकल वांद्रे, दादर येथे शॉर्ट टर्मिनेट करणार आणि तेथून परतीचा प्रवास.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT