MSCB Scam : दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह ७० जणांना न्यायालयाची 'क्लीन चिट'

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : अण्णा हजारेंचा आक्षेप अन् ED चा अर्ज फेटाळला, आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट मुंबई हायकोर्टाने स्विकारला
MSCB Scam : दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह ७० जणांना न्यायालयाची 'क्लीन चिट'
Published on
Updated on

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे केंद्रस्थानी राहिलेल्या 'महाराष्ट्र राज्य सहकारी बँक' घोटाळा प्रकरणात शुक्रवारी (दि. २७) एक अत्यंत महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. या निर्णयामुळे दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रोहित पवार यांच्यासह ७० जणांना मिळालेली क्लीन चिट आता अधिकृतपणे कायम झाली आहे.

अण्णा हजारे आणि ED चा अर्ज फेटाळला

या प्रकरणाचा तपास पुन्हा व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दाखल केलेला आक्षेप अर्ज आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिलेला हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ईडीने हा अर्ज टिकवण्यासाठी न्यायालयात जोरदार प्रयत्न केले होते, मात्र पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने तो फेटाळून लावत तपास बंद करण्यावर शिक्कामोर्तब केले.

काय आहे प्रकरण?

२००७ ते २०११ या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने निकषांना बगल देत साखर कारखाने आणि सूतगिरण्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप होता. यातील अनेक साखर कारखाने एनपीए झाले होते, त्यांना पुन्हा कर्ज देऊन, पुढे कर्ज फेडले न गेल्यामुळे हे कारखाने कवडीमोल भावात संचालकांच्या नातेवाईकांनी हस्तगत केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावरून राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news