Malvani MHADA Ground Pudhari
मुंबई

Malvani MHADA Ground | मालवणी म्हाडा मैदानात नशेखोरांचा वावर; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

फिनिक्स मॉल दुर्घटनेनंतरही प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

Malvani MHADA Ground Drug Addicts Menace

मालाड: मालवणी गेट क्रमांक ८, येथील म्हाडा मैदानाच्या चारही बाजूंना नशेखोरांचा वाढता वावर आणि खुलेआम सुरू असलेली नशा यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मैदानातून ये-जा करताना महिला, लहान मुले आणि कुटुंबीयांना भीतीच्या वातावरणातून मार्ग काढावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक वापरासाठी असलेल्या या मैदानाच्या परिसरात नशेखोरांचा वावर वाढत असल्याने सामान्य नागरिकांनी आपल्या कुटुंबासह सुरक्षितपणे ये-जा करायची तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मैदान हे नागरिकांसाठी, मुलांच्या खेळण्यासाठी आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी असताना तेथे अशा प्रकारचे वातावरण निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे.

फिनिक्स मॉलमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मालवणी म्हाडा मैदानातही एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

म्हाडा प्रशासन, मुंबई पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मैदान परिसरात नियमित गस्त वाढवावी, नशेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या मैदानात दर रोज दिवसा ढवळ्या,तसेच संध्याकाळी तर नशा खोर मैफल जमवून बसतात आणि हे सर्व खुले आम सुरु असता. या बाबत अनेक संस्था , संघटनांनी पोलीस, म्हाडा आणि पालिका प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्या तक्रारींना प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT