Mumbai News | दादर-प्रभादेवी मधील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन; रेल्वे मंत्र्यांकडून तोडक कारवाईला स्थगिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर रेल्वे मंत्र्यांकडून दादरमधील तोडक कारवाईला स्थगिती
Dadar Railway New Platform
Dadar Railway Pudhari
Published on: 
Updated on: 

Dadar Prabhadevi Residents Rehabilitation

मुंबई : दादर प्रभादेवी येथील रेल्वेच्या जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कानावर घातल्यानंतर या तोडक कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी दिले. दरम्यान, रेल्वेच्या जागेवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

दादर - प्रभादेवी येथे रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि राज्याचा गृहनिर्माण विभाग यांनी एकत्रितपणे या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विकास आराखडा तयार करून रेल्वे मंत्रालयाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार या दोन्ही यंत्रणांनी मिळून तयार केलेला विकास आराखडा रेल्वे मंत्रालयाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आज रेल्वेने आज या पाडकामासाठी प्रभादेवी परिसरात पथके पाठवल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Dadar Railway New Platform
Mumbai Lalbaug fire news: लालबागमध्ये इमारतीला भीषण आग; रहिवाशांची मोठी धावपळ, नेमकं काय घडलं?

मात्र या कारवाईबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबतची सद्यस्थिती सांगितली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना या बैठकीची माहिती देऊन त्यांना या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. यानंतर रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगून ही कारवाई थांबवून रहिवाश्यांना दिलासा दिला.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि राज्याच्या गृहनिर्माण विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यामुळे रहिवाशांचे पुनर्वसन तर होईलच पण रेल्वेला अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. हाच विकास आराखडा मुंबई उच्च न्यायालयात सादर करून त्यांनाही याबाबत अवगत करण्यात येणार आहे.

Dadar Railway New Platform
Mumbai News : माटुंगा लेबर कॅम्पमधील पादचारी पुलाचे काम रखडले; नागरिक त्रस्त

त्यामुळे या आराखड्याला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी लवकरात लवकर मंजुरी दिल्यास या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना दिलासा देणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.