मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून रविवार, ६ सप्टेंबर रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे.
हा ब्लॉक मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यानच्या 'अप' व 'डाऊन' धीम्या मार्गांवर आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या 'अप' व 'डाऊन' मार्गांवर घेण्यात येणार आहे.
यामुळे मेन लाईनवर सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन' धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी.

स्थानकांदरम्यान 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील
हार्बर लाईन : सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे/गोरेगाव येथे ये-जा करणाऱ्या लोकल रद्द राहणार आहेत. तसेच पनवेल आणि कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत जातील. ट्रान्स-हार्बर लाईन आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेचा चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो ब्लॉक
ट्रॅक,सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेकडून रविवार, ६ सप्टेंबर रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान जम्बो ब्लॉक लागू करणार आला आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ पर्यंत अप आणि डाउन फास्ट लाईन्सवर पाच तासांचा असणार आहे.
या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व फास्ट लाईन गाड्या स्लो लाईन्सवर धावणार आहेत. तसेच काही लोकल रद्द केल्या जाणार असून चर्चगेटच्या काही गाड्या वांद्रे/दादर स्थानकांवरच थांबवून उलट दिशेने वळवण्यात येणार आहेत.