Mumbai Dahi Handi Traffic Diversion: दहीहंडीच्या उत्सवावर पोलिसांची करडी नजर; वाहतुकीसाठी मार्गबदल, गर्दीसाठी विशेष बंदोबस्त

जरीमरी रोडवर सायंकाळी ५ ते रात्री ११पर्यंत निर्बंध; एस. व्ही. रोडवरून हिल रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक वळवली
Mumbai Dahi Handi Traffic Diversion: दहीहंडीच्या उत्सवावर पोलिसांची करडी नजर; वाहतुकीसाठी मार्गबदल, गर्दीसाठी विशेष बंदोबस्त
Published on
Updated on

मुंबई: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन केले आहे. शनिवारी शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथके व नागरिकांची गर्दी होणार असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

वांद्र्यात सहा तास निर्बंध

वांद्रे येथील जरीमारी रोडवर दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी ५ ते रात्री ११पर्यंत वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.

Mumbai Dahi Handi Traffic Diversion: दहीहंडीच्या उत्सवावर पोलिसांची करडी नजर; वाहतुकीसाठी मार्गबदल, गर्दीसाठी विशेष बंदोबस्त
Overseas Education Scholarship: मराठा- कुणबी विद्यार्थ्यांसाठी आता शिष्यवृत्ती मर्यादा नाही! परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

हा आदेश पोलीस उपायुक्त (मुख्यालय व मध्य), वाहतूक डॉ. दीपाली धाटे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. एस. व्ही. रोडवरून हिल रोडच्या दिशेने जरीमरी रोडमार्गे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. विठ्ठल मंदिर सिग्नलवर यू-टर्न घेऊन एस. व्ही. रोडने उत्तरेकडे, त्यानंतर डॉ. व्ही. आर. रघुनाथ मार्ग, सेंट मार्टिन रोडमार्गे हिल रोडकडे जाता येईल.

गोविंदांच्या सुरक्षेकडेही लक्ष

पावसामुळे रस्ते निसरडे झाल्यास मनोरा उभारताना अधिक काळजी घेणे, मनोऱ्याच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ न देणे आणि वैद्यकीय मदत उपलब्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.

Mumbai Dahi Handi Traffic Diversion: दहीहंडीच्या उत्सवावर पोलिसांची करडी नजर; वाहतुकीसाठी मार्गबदल, गर्दीसाठी विशेष बंदोबस्त
Digital Arrest CBI Action: डिजिटल अरेस्टचा पर्दाफाश; सीबीआयची देशभर छापेमारी; तीन आरोपी अटकेत

घाटकोपरमध्ये १६ तासांहून अधिक काळ मार्ग बंद

घाटकोपर पश्चिमेतील टिळकवाडी, साईनाथनगर येथे मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील श्रेयस जंक्शन ते भीमनगर जंक्शनदरम्यानची दक्षिण वाहिनी सकाळी ७ ते रात्री ११.३० पर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. हा आदेश पूर्व उपनगर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाने जारी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news