मुंबई - कसारा लोकलवर दरड कोसळली  Pudhari Photo
मुंबई

Mumbai Breaking |.....अन मुंबई - कसारा लोकल थोडक्यात बचावली

ट्रॅकलगत असलेल्या टेकडीवरील दरड अचानक कोसळली : दरवाजात उभे असलेले दोन प्रवाशी जखमी

पुढारी वृत्तसेवा

शाम धुमाळ

कसारा : मुंबईहून कसारा येणारी लोकल रात्री नऊ वाजता दरम्यान कसारा रेल्वे स्थानकात येत असता प्लॅटफॉर्म साठी ट्रॅक बदलत असताना ट्रॅकलगत असलेल्या उंच अशा डोंगर टेकडीवरील दरड अचानक कोसळली. सदर दरड ही थेट लोकलवर कोसळली यात दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून अचानक कोसळलेल्या दरडीमुळे लोकलला ही काही प्रमाणात धक्का बसला. परंतू मोटर मन ने सावधगिरी ने लोकल कसारा स्थानकात आणून सोडली.

आज मंगळवार रात्री नऊच्या सुमारास मुंबईहून कसारासाठी येणारी लोकल प्लॅटफॉर्म नंबर चार वर येण्यासाठी ट्रॅक बदलत असताना ट्रॅकच्या काही अंतरावर असलेले दरड अचानक लोकलवर कोसळली. काही प्रमाणात काही प्रमाणात दरड ही अर्धी लोकलमध्ये तर आरती दरड ट्रॅकलगत पडली मातीचा मलबा, छोटे मोठे दगड व छोटी झाड खाली आली या अचानकच्या कोसळलेल्या दरडीमुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी बाळू जाधव रा. पंचशील नगर, तुकाराम जाधव रा शिवाजी नगर. कसारा हे गंभीर जखमी झाले. तर या दरडीमुळे लोकललाही काही प्रमाणात धक्का बसला. या दरडीमुळे गंभीर दुखापत झालेल्या जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा चे सदस्य प्रमोद वारंगुसे यांनी लोकलमधील सहप्रवाशांच्या मदतीने कसारा रेल्वे स्थानकात उतरवले सदर घटना तत्काळ रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली. रेल्वेचे आरपीएफ कर्मचारी रवींद्र गोसावी यांनी मदतीसाठी कर्मचारी पाठवून आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांच्या मदतीने जखमीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारात दाखल केले .

दरम्यान यावेळी रेल्वे स्थानकावर आवश्यक असलेले आपत्कालीन साहित्य उदाहरणार्थ स्ट्रेचर विल चेअर यासह जीआरपी पोलिसांची मदत मिळाली नाही. सदर घटनेची माहिती रेल्वेच्या आपत्कालीनियंत्रण कक्षा मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी रेल्वे ट्रॅक वर आलेले दरड दगड बाजूला केले व नऊ वाजून 21 मिनिटांनी कसारा मुंबईकडे आणि लोकल पंधरा मिनिटे उशिराने रवाना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT