मुंबईकरांचे घर क्षेत्रफळामध्ये सर्वांत लहान! pudhari photo
मुंबई

Mumbai smallest house size : मुंबईकरांचे घर क्षेत्रफळामध्ये सर्वांत लहान!

मुंबईतील लोकसंख्येच्या घनतेमुळे येथील घरांचे क्षेत्रफळ इतर शहरांच्या तुलनेत सर्वात कमी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई :देशभरात ग्राहकांनी खरेदी केलेल्या घरांच्या सरासरी क्षेत्रफळामध्ये 2025 या वर्षात काही प्रमाणात वाढ झालेली दिसून आली; मात्र देशातील 7 महत्त्वाच्या शहरांची तुलना करता महामुंबईतील घर सर्वांत लहान आहे. येथील घरांचे सरासरी क्षेत्रफळ 904 चौरस फूट आहे.

देशभरातील ग्राहक किती क्षेत्रफळाच्या घरांना पसंती देतात याबाबतचे सर्वेक्षण ॲनारॉकने केले. यात महामुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. सरासरी क्षेत्रफळामध्ये सर्वच ठिकाणी वाढ झालेली दिसत आहे; मात्र यात महामुंबईतील घर सर्वांत लहान आहे. महामुंबईतील घरांचेसरासरी क्षेत्रफळ 2023 साली 810 चौरस फूट होते. 2025 साली ते 12 टक्क्यांनी वाढून 904 चौरस फुटांपर्यंत गेले. मुंबईतील लोकसंख्येच्या घनतेमुळे येथील घरांचे क्षेत्रफळ इतर शहरांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

पुण्यातील घरांचे सरासरी क्षेत्रफळ 2023 साली 1070 चौरस फूट होते. 2025मध्ये ते 1119 चौरस फूट झाले. येथे केवळ 5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हैदराबादमधील घरे सर्वात मोठी आहेत. येथील सरासरी क्षेत्रफळ 2299 चौरस फूट होते. सध्या ते 2600 चौरस फूट आहे. दिल्लीतील घरांच्या सरासरी क्षेत्रफळात सर्वाधिक 30 टक्के वाढ नोंदवली गेली. 2023 साली येथील घरे 1890 चौरस फुटांची होती तर सध्या ही घरे 2466 चौरस फुटांची आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT