Ro-Ro service : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा 1 मार्चपासून

सात तासांचा प्रवास : तिकीट दर तीन ते नऊ हजार रुपये
Mumbai to Vijaydurg Ro-Ro service
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा 1 मार्चपासूनpudhari photo
Published on
Updated on

मुंबई/कणकवली ः कोकणात आता सागरी जल वाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान कोकण किनारपट्टीवर रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवेचे उद्घाटन एक मार्च रोजी सकाळी 8 वा. सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मात्र या अतिजलद जलप्रवासासाठी तीन हजार ते नऊ हजार रुपये मोजावे लागणार असल्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे. या सेवेद्वारे अवघ्या 7 तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे.

या ऐतिहासिक प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात मंत्री नितेश राणे स्वतः प्रवाशांसोबत या फेरीतून प्रवास करणार आहेत. आशियातील ही सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा मानली जात आहे. ही फेरी दर बुधवारी व शनिवारी सकाळी 8 वा. मुंबईवरून प्रस्थान करेल व दुपारी 3 वा. विजयदुर्गला पोहोचेल. विजयदुर्ग - मुंबई परतीच्या प्रवासासाठी दर गुरुवारी व रविवारी दुपारी 12 वा. ही बोट विजयदुर्गहून प्रस्थान करणार असून मुंबई येथे सायं. 7 वा. पोहोचेल. जल वाहतुकीला चालना देण्याच्या शासनाच्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई-कोकण मार्गावर प्रवासी रो- पॅक्स फेरी सेवा चालविण्यासाठी एमटूएम फेरीज प्रा.लि. यांना परवानगी दिली आहे.

Mumbai to Vijaydurg Ro-Ro service
Akurdi Zoological Survey Museum: आकुर्डीत देशातील पहिले एकात्मिक प्राणिशास्त्र संग्रहालय; पिंपरी-चिंचवडची नवी ओळख

सेवा चालविण्यासाठी एमटूएम फेरीज प्रा.लि. यांना परवानगी दिली आहे. ही संस्था सध्या मुंबईतील भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यातील मांडवा या जलमार्गावर रो-पॅक्स सेवा यशस्वीपणे चालवत आहे. त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनूभव आहे. मुंबई -विजयदुर्ग या सेवेसाठी संस्था आधुनिक व सर्वसुविधायुक्त ‌‘एमटूएम प्रिन्सेस‌’ हे जहाज चालवणार आहे. एका फेरीमध्ये 620 प्रवासी व 35 वाहने वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे.

या सेवेमुुळे मुंबई आणि कोकण दरम्यान सागरी मार्गाने जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र प्रवासाचे दर प्रचंड असल्याने खिशाला चांगलीच चाट बसणार आहे. कोकणातील सणासुदीच्या काळात रेल्वे आरक्षणाची अडचण तसेच रस्ते वाहतुकीतील वाढती कोंडी लक्षात घेता ही फेरी सेवा कोकणवासीयांसाठी दिलासा ठरणार आहे.

या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार व प्रादेशिक संपर्क वाढीस चालना मिळणार असून सागरी वाहतुकीला नवे बळ प्राप्त होणार आहे. या फेरी सेवेसाठी तिकीट विक्री सुरू झाली असून www.m2mferries.com या संकेतस्थळाला भेट देऊन तिकीट बुकिंंग व अधिक माहिती घेता येणार आहे.

Mumbai to Vijaydurg Ro-Ro service
‘एअर स्ट्राईकचा नक्की बदला घेऊ’, १९ मृत्यूंमुळे संतप्त अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला इशारा

कार प्रकार - भाडे

XL(अतिरिक्त मोठी) - रु. 9,000

L(मोठी) -रु. 8,000

M(मध्यम)- रु. 7,000

S(लहान) -रु. 6,000

इतर वाहने - भाडे

दुचाकी (बाईक) - रु. 1,000

सायकल - रु. 600

प्रवासी वर्ग भाडे

इकॉनॉमी - रु. 3,000

प्रीमियम इकॉनॉमी - रु. 5,000

बिझनेस - रु. 7,000

फर्स्ट क्लास- रु. 9,000

सेवेचे वेळापत्रक

  • मुंबईहून प्रस्थान : दर बुधवारी व शनिवारी सकाळी 8 वाजता.

मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास या एमटूएम प्रिन्सेस जहाजातून होणार आहे. एका फेरीत 620 प्रवासी व 35 वाहने वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

सर्व प्रवाशांनी फेरी सुटण्याच्या किमान 90 मिनिटे आधी टर्मिनलवर पोहोचणे अनिवार्य आहे. विजयदुर्ग व मुंबई प्रवासासाठी चेक इन काऊंटर निर्धारित वेळेच्या 30 मिनिटे आधी बंद होईल. जहाजावर प्रवाशांच्या खानपानासाठी ‌‘मीमोज‌’कॅफेची सोय करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news