राज्यात गुरुवारपर्यंत तीव्र उष्णतेची लाट File Photo
मुंबई

Mumbai weather update : मुंबईवर सूर्याचा प्रकोप सुरूच!

उष्ण लाटेचा अंदाज; शुक्रवार, शनिवारी पारा जाणार 38 वर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सूर्याचा प्रकोप कायम असून दोन दिवसांनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी (13 आणि 14 मार्च) पारा 38 अंशांवर जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) साप्ताहिक फोरकास्टमध्ये सांगण्यात आले आहे.

सांताक्रूझ वेधशाळेमध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवारी कमाल तापमान अनुक्रमे 38.9, 39 आणि 37 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. 10 मार्चला नोंदवले गेलेले 39 अंश सेल्सिअस हे यंदाचे सर्वाधिक तापमान ठरले. मात्र 11 मार्चला 36 आणि 12 मार्चला 33 अंश सेल्सिअसवर पारा उतरला. आता शुक्रवारी पुन्हा पारा 38 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.

आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस पारा चाळिशीच्या घरात गेला तरी प्रत्यक्षात जाणवणारे तापमान चाळिशीहून अधिक होते.

सर्वांत उष्ण आठवडा

8 मार्च - 37 अंश सेल्सिअस

9 मार्च - 38.9

10 मार्च - 39

11 मार्च - 36

13 मार्च - 38 (अपेक्षित)

14 मार्च - 37 (अपेक्षित)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT