उद्यापासून मुंबईत उष्णतेची लाट pudhari photo
मुंबई

Mumbai weather update : उद्यापासून मुंबईत उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला अंदाज

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मार्च महिन्याच्या तिसऱ्या वीकेंडला पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पारा चाळिशीच्या घरात गेल्याने सोमवार, मंगळवारी (23 आणि 24 मार्च) उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेत शुक्रवारपासून तापमानात वाढ झाली. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवारी किमान 23 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. पारा पस्तिशीमध्ये गेल्याने मुंबई शहर आणि उपनगरे तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वेधशाळेच्या माहितीनुसार, तापमान 35 अंशांवर गेले तरी प्रत्यक्षात जाणवणारे तापमान अधिक होते. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाचा मोठा तडाखा बसला.

रमझान ईदनिमित्त शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईतील चौपाट्यांवर गर्दी होती. प्रखर उन्हामुळे अनेकांनी झाडांच्या सावलीचा आधार घेतल्याचे दिसून आले. खूप ऊन असल्याने संध्याकाळी गर्दीत वाढ झाली.

सोमवारपासून तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. 23 आणि 24 मार्च रोजी कमाल तापमान सरासरी 36 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे दोन्ही दिवशी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन्ही दिवशी घराबाहेर पडताना पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT