मुंबई

Mumbai Rains : मुंबईत पावसामुळे पाणी तुंबू लागले; लोकलच्या सेवेवरही परिणाम

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा Mumbai Rains आज (शुक्रवार) सकाळपासून मुंबई शहर व उपनगरात पडत असलेल्या पावसामुळे सकल भागात पाणी तुंबू लागले आहे. सायन गांधी मार्केट येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले असून, रस्त्यावरील वाहतुकही मंदावली आहे. पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी पालिकेची टीम रस्त्यावर उतरली आहे.

सायनसह चेंबूर, दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, कुर्ला आदी भागात वाहतूक कोंडी झाली असून, मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकलही 5 ते 10 मिनिट विलंबाने सुरू आहेत. दरम्यान येत्या दोन-तीन तासात काही ठिकाणी तुरळक काही ठिकाणी जोरदार सरी Mumbai Rains पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT