Mumbai Idol Makers Pudhari
मुंबई

Mumbai Idol Makers: हजारो गणेशमूर्तीं कारखान्यात पडून! मूर्ती ठेवण्यासाठी मूर्तीकारांपुढे आर्थिक भुर्दंडाचे संकट

हजारो मूर्तींची विक्री न झाल्याने कारखान्यात साठा; तात्पुरते कारखाने बंद झाल्यावर मूर्ती ठेवण्याचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहर व उपनगरात पेण आदी भागातून मुर्त्या आणून त्याची विक्री करणाऱ्या व्यवसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात गेल्या कित्येक वर्षापासून मूर्ती घडवणाऱ्या पारंपारिक मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हजारो मुर्त्यांची विक्री न झाल्यामुळे त्या कारखान्यात पडून आहेत. त्यामुळे तात्पुरता असलेला हा कारखाना बंद झाल्यानंतर या मूर्ती ठेवायच्या कुठे, असा प्रश्न निर्माण मूर्तीकारांपुढे निर्माण झाला असून मूर्ती सांभाळायच्या झाल्यास महिन्याला भाड्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याची चिंता त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे..

पेणच्या घरगुती गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांची पसंती असते. त्यामुळे मुंबई शहरामध्ये गेल्या ५० ते ६० वर्षांपेक्षा जास्त काळापासून मुर्तींची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

शहरामध्ये ठिकठिकाणी पेणच्या गणेश मूर्तींची दुकान थाटलेली असल्यामुळे गणेश कारखान्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या घटत चालली आहे. यंदाही अनेक जुन्या मूर्तिकारांनी घरगुती मुर्ती घडवल्या. पण यातील जेमतेम ४० ते ५० टक्के मूर्तींचीविक्री झाली.

अनेक कारखान्यांमध्ये ६० ते ७० तर काही कारखान्यांमध्ये २०० ते २५० मुर्ती शिल्लक राहिल्या आहेत. संपूर्ण मुंबई शहरामध्ये ८ ते १० हजार मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या मूर्ती पुढील वर्षीपर्यंत ठेवायच्या कुठे, असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे.

या मुर्त्या जपून ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घ्यायची झाली तरी महिना २५ ते ३० हजार रुपये भाडे भरावे लागेल. त्यामुळे अगोदरच मुर्तींची विक्री कमी झाल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेले मूर्तिकार अजूनच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

पेणच्या गणेशमूर्तिंमुळे विक्री मंदावली

मुंबईतील मूर्तीकारांनी बनविलेल्या मूर्तींची किंमत ५ ते ६ हजाराच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

पेण येथून मुर्त्या आणून विक्री करत असल्यामुळे पेणच्या मुर्त्यांची किंमतही कमी आहे.

चार ते साडेचार हजारांची मूर्ती पेणच्या मूर्तीकारांकडून दोन ते अडीच हजाराला विकली जाते.

त्यामुळे मुंबईतील पारंपारिक मूर्तीकार गेल्या काही वर्षापासून आर्थिक अडचणीत आला असल्याची मूर्तिकार सुधीर मयेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT