BEST Bus Route Changes: मुंबईकरांनो, बेस्ट बसचे मार्ग बदलणार! ५ ऑक्टोबरपासून नवे बदल; काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या

ए-२२, ए-३५, ए-३९ मार्ग सीप्झ बस स्थानकात समाप्त; ए-६२ आणि ए-२०० मार्गांचा विस्तार
BEST
BEST Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: बेस्ट उपक्रमाने येत्या ५ ऑक्टोबरपासून बस प्रवर्तनात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विविध बसमार्गांचे सुसूत्रीकरण, मार्गविस्तार, अतिरिक्त फेऱ्या व सर्वसाधारण बसमार्गांचे वातानुकूलित बससेवेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बदलांनुसार ए-२२, ए-३५ आणि ए-३९ या तीन बसमार्गाचे प्रवर्तन यापुढे मजास आगार ऐवजी सीप्झ बस स्थानक येथेच समाप्त होणार आहे.

बस ए-६२ मार्ग वत्सलाबाई देसाई चौक येथून मदन मोहन मालवीय मार्गे वसंतराव नाईक चौक (ताडदेव)पर्यंत करण्यात आला आहे.

BEST
Nilesh Patkar: माजी बेस्ट अधिकारी निलेश पाटकर यांचे दुबईत निधन!

बस ए-२०० रफी अहमद किडवाई मार्ग, झकेरिया बंदर मार्ग आणि श्रीकांत केशव हडकर मार्गे श्रावण यशवंते चौक (काळाचौकी)पर्यंत वाढविण्यात येणार आहे. बोरिवली बस ए-२४५, कांदिवली बस ए-२७६ या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. बेस्ट प्रशासनाने काही बसमार्गांचे वातानुकूलित बससेवेत रूपांतर करण्याचाही निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news