Ganesh Idol Photo Ban Pudhari
मुंबई

Ganesh Idol Photo Ban: विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास मुंबईत बंदी!पोलिसांचा आदेश

२२ ते २६ सप्टेंबरपर्यंत बंदी; पाण्यात तरंगणाऱ्या किंवा अर्धवट विसर्जित मूर्तींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासही मनाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गणेश विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या किंवा अर्धवट पाण्यात असलेल्या गणेशमूर्तींचे छायाचित्र काढणे, तसेच अशी छायाचित्रे प्रकाशित अथवा प्रसारित करण्यास मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे.

धार्मिक भावना दुखावण्यासह सार्वजनिक शांतता आणि सलोखा बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला आहे. २२ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई परिसरात ही मनाई लागू राहणार आहे.

मुंबईचे पोलीस उपायुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे. विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या अथवा अर्धवट पाण्यात असलेल्या गणेशमूर्तींचे फोटो काढू नयेत, तसेच ते प्रकाशित किंवा प्रसारित करू नयेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. विसर्जनानंतर काही गणेशमूर्ती पूर्णपणे पाण्यात न विरघळता समुद्रकिनारी, तलाव किंवा विसर्जनस्थळांवर आढळतात. काही मूर्ती पाण्यावर तरंगताना दिसतात.

अशा मूर्तींचे छायाचित्रण करून ते सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून प्रसारित केल्यास धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बंदी पोलिसांनी घातली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT