Mumbai Fish Price Pudhari
मुंबई

Mumbai Fish Price: मुंबईत पापलेट1200 रुपयांवर; सुरमई देखील हजारावर

मुंबईत सरासरी 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर वाढले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

गणेश शिंदे

मुंबई: हवामानातील बदल, कमी झालेली माशांची उत्पत्ती आणि मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थिती यामुळे बल्क वर्गातील डिझेलचे दर प्रतिकिलो दुपटीने वाढलेल्या किमतीचा परिणाम सर्व प्रकारच्या माशांच्या दरावर झाला आहे.

मुंबईत सरासरी 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर वाढले आहेत. सध्या मुंबईतील बाजारात पापलेटचा दर 1200 रुपये, तर सुरमई 700 रुपयांवरून 1 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

आखाती युद्धामुळे तेल पुरवठा कमी होत आहे.समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीमध्ये सुमारे दोन ते तीन हजार बल्क वर्गातील डिझेल लागते. त्यातच हे डिझेल यापूर्वी 70 रुपयांना प्रतिलिटर होते,ते आज 144 रुपयांवर गेले आहे.

सध्या समुद्रात बोटी जाण्याचे प्रमाण घटले आहे. मोठ्या बोटी बंदरांवर थांबून आहेत. त्यातून माशांची आवक घटल्याने तीन दिवसांपूर्वी असलेल्या सर्व प्रकारच्या माशांच्या दरात सरासरी 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

मुंबईतील बाजारात पापलेट 1200 रुपये किलो, सुरमई 1000 रुपये,रावस मासा 700 रुपये, तर हलवा मासा 850 रुपये किलोवर पोहोचल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून पुढारीला सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT