BMC  pudhari photo
मुंबई

Fire Brigade Uniform: अग्निशमन दलातील जवानांच्या गणवेश खरेदीचा मार्ग मोकळा; महापालिका १६ कोटी रुपये खर्च करणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन जवानांसाठी गणवेश खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिका प्रशासनाकडून यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात २०२४ मध्ये भरती झालेले सुमारे ३०० पेक्षा अधिक जवान गणवेशापासून वंचित आहेत.

याविषयीचे वृत्त दै. पुढारीने १९ सप्टेबर २०२५ रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल पालिका प्रशासनाने तब्बल ११ महिन्यानंतर घेतली. आणि आता अग्निशमन दलातील जवानांसाठी २ हजार १७६ स्वसंरक्षण गणवेश खरेदी करण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरामध्ये उद्भवणाऱ्या आगीच्या घटना, इमारत दुर्घटना, रेल्वे अपघात किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण आणि वित्त वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान २४ तास सज्ज असतात.

अशा आव्हानात्मक परिस्थितीत धगधगत्या ज्वाळा आणि प्रचंड उष्णतेचा सामना करत जीवाची बाजी लावणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांना दोन वर्षांपासून गणवेश नव्हता. परिणामी त्यांना जीव धोक्यात टाकून आग विझविण्याची भूमिका पार पाडावी लागत होती.

स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर

जवानांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका आता अत्याधुनिक 'स्वसंरक्षण उपकरण संच' खरेदी करणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय व भारतीय मानकांवर आधारित कोट, ट्रॉऊझर, हुड आणि ग्लोव्ह्ज अशा २,१७६ संचांचा समावेश असून, यासाठी सुमारे १५ कोटी ९९ लाख ९६ हजार २४९ रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त कार्यालयाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.

दोन वर्षांनी गणवेश संच बदलण्याचा नियम

अग्निशमन दलाच्या नियमावलीनुसार प्रत्यक्ष घटनास्थळी आग विझवताना होणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी हा विशेष सुरक्षा गणवेश परिधान करणे बंधनकारक असते. यापूर्वी २०१७-१८ तसेच २०२०-२१ या वर्षांत युरोपियन मानकांनुसार अशा गणवेशांची खरेदी करण्यात आली होती. नियमानुसार दर दोन वर्षांनंतर हा गणवेश संच बदलणे अत्यावश्यक आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT