मुंबई : प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात जाऊन शेतकरी आणि शेतमजूर यांची हक्क यात्रा काढून 17,18, आणि 19 सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य आंदोलन करण्याच्या इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. हमीभाव हा चुकीच्या पद्धतीने दिला जातो, कर्जमाफीच्या संदर्भात, पेरणी ते कापणी पर्यंत सर्व खर्च एमआरएचएस मध्ये देण्यात यावे. या सर्व मागण्या घेऊन शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत असून येणाऱ्या 28 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचा मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारासुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे.
आरक्षणाकरता आग लावायचे धंदे बंद झाले पाहिजे, छगन भुजबळ यांना टोला
आरक्षणासंदर्भात सरकार दिशाभूल करत आहे, हैदराबादला कोर्टात आव्हान देणार असा छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर देत प्रहार चे बच्चू कडू म्हणाले की, सरकार कुणाचे आहे त्यांचीच आहे आणि छगन भुजबळ कुणाचे? देवा भाऊ आणि सरकारला इडीचे चे भय दाखवून फोडता येत, तिथे जे कौशल्य दाखवलं ते आरक्षणात दाखवा, असे म्हणत सरळ राज्य सरकार वर निशाणा साधत बच्चू कडू पुढे म्हणाले की, या आरक्षणाच्या लढाईत गावागावांमध्ये आग लागली त्याचे परिणाम कोण भोगणार आहे. आणि सत्तेत राहून आग लावण्याचे धंदे बंद झाले पाहिजे, असा टोला बच्चू कडू यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.
सामनातील देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आतून आहे की बाहेरून?
सामना अगं लेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांचे आंदोलन संयमी पद्धतीने हाताळले असा उल्लेख केला आहे. यावर प्रतिक्रिया देत बच्चू कडू म्हणाले की, इतकं चांगलं त्यांनी हँडल केलं तर कौतुक काही होणार का? असा टोला लगावत पुढे म्हणाले की मात्र हे कौतुक आतून आहे की बाहेरून हे सुद्धा तपासण्याचे गरज असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
कार्यकर्त्यांनी सुद्धा कमावलं पाहिजे - अजित पवार वायरल व्हिडिओ
अजित पवार यांचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते ज्यात ते IPS अधिकाऱ्यांना धमकावत आहे. यावर बच्चू कडू आणि प्रतिक्रिया देते म्हणाले की,"अजित पवार यांना कार्यकर्त्यांना पोसाव लागत नाही का?. अधिकाऱ्यांनी पैसे कमावले तर कार्यकर्त्यांनी कमावले पाहिजे. असा टोला बच्चू कडू यांनी अजित पवार यांना लगावला आहे.