मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका कार्यालयाशेजारी असलेली राजीव गांधी भवनमधील मुंबई काँग्रेसची कॅन्टीन थकित बिलामुळे पुन्हा बंद करण्यात आली आहे.
काही महिन्यापूर्वी मुंबई काँग्रेसची बंद असलेली कॅन्टीन एका तरुणाने चालविण्यासाठी घेतली होती. १२ एप्रिल २०२३ पासून ही कॅन्टीन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू होती. स्वच्छता, दर्जेदार पदार्थ मिळत असल्यामुळे काही दिवसांमध्ये ही कॅन्टीन लोकप्रिय झाली होती.
या कॅन्टीनमध्ये काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस, नगर विकास कार्यालयाचे कर्मचारी, किला कोर्टचे कर्मचारी, वकील, महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, इतर राजकीय पक्ष, आझाद मैदानातील आंदोलकांची ऊठबस होती. परंतु आता ही कॅन्टीन बंद करण्यात आल्याने या सर्वांची गैरसोय होणार आहे.
हेही वाचा