धक्‍कादायक : मुंबईतील हॉटेल्‍सना मृत कोंबड्यांची विक्री | पुढारी

धक्‍कादायक : मुंबईतील हॉटेल्‍सना मृत कोंबड्यांची विक्री

मुंबई ; पुढारी वृत्तसंस्था वाहतुकी दरम्यान मेलेल्या कोंबड्यांची ३० रुपयात मुंबई मधील हॉटेल व्यवसायिकांना विक्री होत असल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. (रविवार) दुपारी काशिमीरा एका व्यक्तीला मेलेल्या कोंबड्या विक्रीसाठी नेत असताना रंगेहाथ पकडले.

मुंबईतील हॉटेलांमध्ये बॉयलर कोंबड्यांची विक्री लहान टेंम्पोतून केली जाते. यावेळी वाहतूकीदरम्यान अनेक कोंबड्या मरण पावतात. हे टेम्पो दहिसर टोलनाक्याजवळ असेलला काशिमीरा उड्डाणपूलाखाली उभे असतात. तेव्हा या मेलेल्या कोंबड्या हॉटेल विक्रेत्यांना स्वस्तात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास मेलेल्या कोंबड्या घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मीरा भाईंदर  येथील काही समाजसेवकांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मेलेल्या कोंबड्या आपण नाल्यात फेकून देत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. मात्र कुठल्या नाल्यात फेकल्या ते या व्यक्तीला सांगता आले नाही. अधिक चौकशीत या मेलेल्या कोंबड्याची विक्री मुंबईच्या बांद्रा परिसरातील काही हॉटेल व्यवसायिकांना करत असल्याची कबुली त्याने दिली. ३० रुपयांना एक कोंबडी विकत असल्याचे त्याने सांगितले. या सर्व घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर वायरल होत आहेत. तर याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे या प्रकाराती तक्रार दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन जाभंळे यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button