Mumbai Mega Block Pudhari
मुंबई

Mumbai Mega Block: मरेचा मुख्‍य मार्गिकेसह हार्बरवर उद्या मेगाब्लॉक!

या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवारी (१२ जुलै) रोजी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक मुख्‍य मार्गिकेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार तसेच चुनाभट्टी/वांद्रे (अप आणि डाऊन) मार्गिकेवर सकाळी १०.५५ ते दुपारी १५.५५ वाजेपर्यंत आहे.

मुंबई येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत.

पुढे विद्याविहार स्थानकावर त्या डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच घाटकोपर येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत.

सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर लाईनवर सकाळी ११.४० ते दुपारी १६.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी हार्बर अप लाईनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक आहे.

मुंबईहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी १६.४३ या वेळेत मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत मुंबई येथे जाणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत मुंबई येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.

ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला(प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT