Mumbai municipal corporation news Pudhari
मुंबई

BMC women leadership: महापालिकेतील महिलाराज! बेस्टसह आठ समित्यांचे अध्यक्षपदही महिलांकडे

मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व महिलांकडे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मंगळवारी अश्विनी भीडे यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये नवा इतिहास रचला गेला. देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार हाकणाऱ्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व प्रथमच महिला करत आहेत.

महापालिकेतील चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदांपैकी तीन अध्यक्ष पदे महिलांकडे तर सहा विशेष समित्यांच्या अध्यक्ष पदांपैकी पाच अध्यक्ष पद महिलांकडे सोपवण्यात आहेत.

मुंबईच्या महापौरपदी आतापर्यंत अनेक महिला विराजमान झाल्या आहेत. पण मुंबई महानगरपालिका आयुक्त पदी आतापर्यंत पुरुष सनदी अधिकाऱ्यांची मक्तेदारी राहिली आहे. आयुक्त पदासाठी महिलांची नाव चर्चेला अनेकदा आली.

पण आयुक्तपदी त्यांना विराजमान होता आले नाही. मुंबई महानगरपालिकेच्या 161 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त पदाची संधी अश्विनी भिडे या वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांस मिळाली आहे.

महापौर पदाच्या गादीवर रितू तावडे असून मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदीही किशोरी पेडणेकर यांच्या रुपाने प्रथमच महिला नगरसेविका विराजमान झाली. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदीही तृष्णा विश्वासराव या पहिल्या महिला बसल्या आहेत. पालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्षपदही महिलांच्या हाती गेले आहे. त्यामुळे महापालिकेत महिलाराजचा नवा इतिहास रचला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT