मुंबई : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे जाहिरात पलक लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशाराच आता मुंबई महापालिकेने दिला आहे. जाहिरात लावणाऱ्या विरोधात महापालिका अॅक्शन मोडवर आली असून दंडात्मक कारवाई करण्यासह पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे जाहिरात कटआउट लावण्यात येतात. यात सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत.
एका जाहिरात पालकाची परवानगी घेऊन त्या परवानगीवर १५ ते २० जाहिरात फलक लावण्यामध्ये राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळे जाहिरात बाजीमुळे संपूर्ण शहर झाकून जाते. या विरोधात आता स्वतः महापौर रितू तावडे व महापालिका आयुक्त अश्विनी भिडे रस्त्यावर उतरले आहेत. जाहिरात करून मुंबई विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जाहिरात फलक लावता क्षणी ते काढण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागांमध्ये विशेष पथक नेमण्यात येणार आहे. ही पदके आपल्या विभागांमध्ये गस्त घालून लावण्यात आलेले जाहिरात फलक काढणार आहे. एवढेच नाही तर जाहिरात पालकाची नोंदही ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह पोलीस कारवाई करणे शक्य होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
जाहिरात फलक दिसल्यास पथकावर कारवाई
जाहिरात फलक जास्त काळ दिसून आल्यास त्या विभागातील पथकातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई दंडात्मक स्वरूपाची असेल अथवा निलंबनाचीही असू शकते. वेळ पडल्या सहाय्यक आयुक्तांनाही जबाबदार करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे विभाग कार्यालय सतर्क झाले आहे.
जाहिरात बाजीचा अहवाल तयार करणार
मुंबई शहर व उपनगरातील पालिकेच्या कोणत्या विभागात किती जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. याचा लेखाजोखा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक विभाग कार्यालयातून याचा अहवाल महापौर व आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत जाहिरातीचे किती फलक लावले जातात व किती जणांवर कारवाई केली, हे समजणार आहे.