

मुंबई आणि पुण्यात केंद्र सरकारची भारत टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. लवकरच कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, नाशिकमध्येही सुरू होईल. जाणून घेऊया या टॅक्सीबद्दल...
स्थापना : ६ जून २०२५ रोजी 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'ची स्थापना. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत टॅक्सीचे अधिकृत लोकार्पण.
कोणाच्या अखत्यारीत ? : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या सहकार्याने कार्यरत असलेली बहुराज्यीय सहकारी संस्था.
चालकच मालक : चालकांना 'सारथी' म्हणून सहकारी संस्थेचे सभासद आणि भागधारक होता येते. संस्थेच्या व्यवस्थापनात प्रतिनिधित्व आणि नफ्यात सहभागाची संधी.
झिरो कमिशन मॉडेल : प्रत्येक राईडच्या भाड्यातून खासगी अॅग्रीगेटरप्रमाणे कमिशन कपात नाही. चालकाला राईडचे संपूर्ण भाडे मिळते. संस्थेच्या अधिशेषाचे वाटप सभासदांना केले जाते.
प्रवाशांसाठी सुविधा : पारदर्शक भाडे, ऑनलाईन बुकिंग, वाहनाचे रिअल टाईम ट्रॅकिंग, बहुभाषिक सुविधा आणि २४ तास ग्राहक सेवा.
महिलांसाठी विशेष सुविधा : 'सारथी दीदी' सुविधेद्वारे महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय. एसओएस आणि लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगसारख्या सुरक्षा सुविधा.
कोणत्या शहरांत सेवा ? : १२ ऑगस्ट २०२६ च्या केंद्र सरकारच्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सेवा सुरू. मुंबई आणि पुणे यांचाही समावेश.
नोंदणीची आकडेवारी : ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ८.४८ लाख चालक आणि ४४. २७ लाख ग्राहकांची नोंदणी.