मुंबई

मुंबई: बाळ वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: हैदराबादच्या योगिता रुमाले भिवंडीत आपल्या आई-वडिलांकडे प्रसूतीसाठी आल्या होत्या. सहा महिन्यांच्या ऋषिकाला घेऊन त्या उपचारासाठी जात होत्या. पण ट्रेन बंद पडल्याने खाली उतरुन जात असताना आजोबांच्या हातातून ऋषिका खाली पडली आणि नाल्यात वाहून गेली. कल्याणच्या पत्रीपुलाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर रेल्वेचा उपाययोजना फोल असल्याचे स्पष्ट झाले होते.

ऋषिका वाहून गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे पोलीस आणि प्रशासनाने लोकल 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ एका जागी थांबल्यास तिची पाहणी केली जाणार आहे. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ या लोकलची पाहणी करतील. यावेळी या लोकलमध्ये अडकलेल्या रुग्ण, लहान मुलं, गरोदर महिला, वयस्कर यांना मदत पोहोचवली जाईल.

दरम्यान, याआधी रात्रीच्या वेळी प्रवास करताना जास्तीत जास्त नऊ तास झोपण्याची परवानगी होती. पण आता ही वेळ कमी करण्यात आली असून, फक्त आठ तास करण्यात आली आहे. याआधी प्रवाशांना एसी कोच आणि स्लीपरमधून प्रवास करताना रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपण्याचा परवानगी होती. पण आता रेल्वेने या नियमात बदल केला आहे. रेल्वेच्या बदललेल्या नियमानुसार, आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपू शकता. म्हणजेच झोपण्याची वेळ आता कमी करुन 8 तास करण्यात आली आहे. ज्या ट्रेन्समध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, तिथेच हा नियम लागू होणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT