मुंबई : दादरमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार | पुढारी

मुंबई : दादरमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : दादरमधील पदपथावर झोपणाऱ्या १६ वर्षांच्या मुलावर ५४ वर्षीय आरोपीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भादंवि आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन दादर पोलिसांनी आरोपी दीपक यादव याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा पनवेलमधील रहिवासी असलेला पीडित मुलगा हा दादर परिसरात मजुरीची कामे करुन येथील आगार बाजार परिसरातील पदपथावर झोपत होता. आरोपी यादव याने मुलगा एकटा झोपत असल्याचे हेरुन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलाने त्याला विरोध केला असता यादव हा त्याला मारहाण करत होता. तसेच याची कुठेही वाच्यता केल्यास यादवने त्याला मारहाण करण्याची धमकी दिली होती. ९ जुलैपासून सुरु असलेले हे अत्याचार सहन न झाल्याने अखेर मुलाने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलाची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करुन यादवला ताब्यात घेत अटक केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button