Mumbai Auto Driver Earnings Video Viral Pudhari
मुंबई

Video Viral: नोकरी की ऑटो? मुंबईतील रिक्षा चालकाची कमाई ऐकून थक्क व्हाल; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Mumbai Auto Driver Earnings: मुंबईतील एका ऑटोचालकाने दिवसाला सुमारे २,५०० रुपये आणि महिन्याला ७५ हजार रुपये कमाई होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rahul Shelke

Mumbai Auto Driver Earnings Video Viral: मुंबईला ‘स्वप्नांची नगरी’ म्हटले जाते. त्यामुळे हे शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. मात्र मुंबईत काही व्यवसाय असेही आहेत ज्यातून लोक अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीची रिक्षाचालका सोबत चर्चा होते. या संभाषणात तो मुंबईतील वाढत्या खर्चाबद्दल बोलत असतो. त्यावर रिक्षाचालक उत्तर देताना म्हणतो की, “मुंबई महाग आहे हे खरं, पण इथे पैसेही भरपूर आहेत. फक्त ते कमावण्याची तयारी असावी.”

या संभाषणादरम्यान रिक्षाचालक सांगतो की, तो दिवसाला सुमारे २,५०० रुपये कमावतो. विशेष म्हणजे हा आकडा त्याच्या सर्व खर्चानंतर उरणाऱ्या रकमेचा असल्याचे तो सांगतो. हे ऐकून व्हिडिओतील व्यक्तीही आश्चर्यचकित होते.

तो लगेचच हिशोब करून सांगतो की दिवसाला २,५०० रुपये मिळत असतील तर महिन्याला जवळपास ७५,००० रुपये कमाई होऊ शकते. त्यावर तो विनोदी पद्धतीने म्हणतो की, “मी बीटेक केल्यानंतर पहिल्या नोकरीतही इतके पैसे कमवत नव्हतो.”

व्हिडिओमध्ये पुढे तो असेही म्हणताना दिसतो की, ऑफिसमध्ये दिवसभर एका क्युबिकलमध्ये बसण्यापेक्षा मुंबईत रिक्षा चालवणे कदाचित अधिक फायदेशीर ठरू शकते. त्याच्या मते या कामामुळे दररोज अनेक लोकांशी भेट होते आणि ‘नेटवर्किंग’ही होते.

या व्हिडिओवर एक मजकूरही लिहिलेला दिसत आहे. ज्यात भारतातील नोकऱ्यांबद्दलची मानसिकता सांगितली आहे. त्या मजकुरात म्हटले आहे की भारतात ३० हजार रुपयांची नोकरी प्रतिष्ठेची मानली जाते, पण महिन्याला ७५ हजार रुपये कमावणाऱ्या रिक्षाचालकाला मात्र तितका आदर मिळत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिला आणि विविध प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी विनोदी प्रतिक्रिया देत “टीम मेंबरची जागा आहे का?” असा प्रश्न विचारला, तर काहींनी मजेत “मला ऑटोवाला व्हायचं आहे” असेही लिहिले.

काही लोकांनी वेगळे मत मांडल आहे. त्यांच्या मते रिक्षाचालकाचे उत्पन्न काही महिन्यांत जास्त असू शकते, पण त्यासाठी दिवसभर उन्हात, ट्रॅफिकमध्ये काम करावं लागतं. तर पगाराच्या नोकरीत स्थिरता, निश्चित वेळ आणि काही प्रमाणात सुरक्षितता मिळते. म्हणूनच अनेकांनी असे मत व्यक्त केले की केवळ पैशांवरून यशाची व्याख्या करता येत नाही. प्रत्येक कामाचे स्वतःचे फायदे आणि तोटे असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT