Mumbai ATS ISIS Probe Pudhari
मुंबई

Mumbai ATS ISIS Probe: मुंबईत एटीएसची मोठी कारवाई; गोवंडी-कुर्ल्यात आयसिसशी संबंधांच्या संशयावर छापे

शिवाजीनगर परिसरातून तिघे ताब्यात; मोबाईल-लॅपटॉप जप्त, डिजिटल नेटवर्कच्या तपासाला वेग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲण्ड सिरिया (इसीस) या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गोवंडी आणि कुर्ला परिसरात छापे टाकले. काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीचा तपशील समजू शकला नाही.

या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. या कारवाईबाबत अधिकृत तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला. विक्रोळी एटीएसकडून या संपूर्ण गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे समजतेे.

कुर्ला आणि गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहणारे काही तरुण इसीससाठी काम करत असून काही गोपनीय माहिती गोळा करुन ती इसीसला पाठवत असल्याची पक्की माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी 2 मार्चला एटीएसच्या एका विशेष पथकाने कुर्ला आणि गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात तीन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या घराची झडती घेतली. तिथे हे तरुण इसीसच्या संपर्कात असल्याचे काही पुरावे हाती लागले.

पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली. या मोबाईलसह लॅपटॉपची तपासणी सुरु आहेे. रात्री उशिरापर्यंत या तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरु होती.

प्राथमिक तपासानुसार तिन्ही तरुण इसीससाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर धर्मांध सामग्रीचा प्रसार करत होते. ते काही संशयित व्यक्तींच्याही संपर्कात होते. त्याबदल्यात या तरुणांना आर्थिक मदत मिळत होती.

या तिघांच्या चौकशीतून ईसीसच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या तरुणांनी त्यांच्या चौकशीत इतर काही संशयितांची नावे सांगितली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT