Mumbai AQI Level: मुंबईत प्रदूषणाचा पुन्हा भडका; सरासरी एक्यूआय 185 पार, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

फेब्रुवारीअखेर दिलासा मिळाल्यानंतर तीन दिवसांत एक्यूआयचा झपाट्याने वाढता आलेख; अंधेरी, बीकेसी, दादर परिसर धोकादायक श्रेणीत
Mumbai Air Pollution AQI
Mumbai Air Pollution AQIPudhari
Published on
Updated on

मुंबई : तापमानात वाढ होत असली तरी मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास तयार नाही. मंगळवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 185वर गेला. फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये (94) एक्यूआय हा शंभरच्या आत आला.

Mumbai Air Pollution AQI
Maharashtra Stray Dog Attack: राज्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; सहा वर्षांत ३० लाखांहून अधिक चावे

प्रदूषण कमी झाल्याने मुंबईकर मोकळा श्वास घेणार असे वाटत असतानाच गेल्या तीन दिवसांमध्ये 106, 128 आणि 185 असा एक्यूआयचा चढता आलेख आहे.

Mumbai Air Pollution AQI
BJP Rajya Sabha: भाजपची 6 राज्यांतून 9 राज्यसभा उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रातील नावांबाबत सस्पेन्स कायम

सांताक्रुझ सर्र्वांत प्रदूषित असून येथील एक्यूआय मंगळवारी 1133 इतका होता. त्याखालोखाल दादर पारसी कॉलनीचा (209) नंबर लागतो. मंगळवारी मुंबईचा सरासरी एक्यूआय तब्बल 195 होता. त्यातही अंधेरी, अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व, बीकेसी हे परिसर अत्यंत धोकादायक हवेचे म्हणून नोंद झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news