नवी मुंबई : नवी मुंबई गेल्या काही दिवसांपासून सायंकाळनंतर धुरक्यात हरवत आहे. शनिवारी रात्री पामबीच मार्गावर वाशी परिसरात अशी गंभीर अवस्था होती. छाया : सुमीत रेणोसे
मुंबई

Mumbai air pollution : महामुंबईची हवा अतिघातक

निम्म्याहून अधिक मुंबईची हवा गुणवत्ता दोनशे पार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच वायू प्रद्यणामध्ये वाढ झाली आहे. तब्बल २२ ठिकाणचा एक्यूआय (हवा गुण-वत्ता निर्देशांक) दोनशेपार गेल्याने निम्म्याहून अधिक मुंबईची हवा आरोग्यास अति घातक बनली आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (एक्यूआय) संकेतस्थळावरील माहितीनुसार, शनिवारी मुंबईचा सरा-सरी एक्यूआय २२० वर पोहोचला. शुक्रवारच्या (१९०) तुलनेत त्यात तब्बल ३० अंकांनी वाढ झाली. दो-नशेपार एक्यूआय हा आरोग्यासाठी अति घातक हवेच्या कॅटेगरीमध्ये मोडतो. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सक्रिय असलेल्या आयएमडी स्टेशन्सचा आढावा घेतल्यास, सर्वाधिक प्रदुषित ठिकाणांमध्ये गोवंडीचा सर्वाधिक २७७एक्यूआय नोंदवला गेला आहे.

स्वच्छ नवी मुंबईतही श्वास कोंडतोय

नववर्षातील पहिला दिवस वगळता नवी मुंबईतील हवामानही आरोग्यास घातक पातळीवर पोहचले आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशे पार गेला होता. सानपाडा हॉटस्पॉट ठरला असून हवा गुणवत्ता निर्देशांक तिनशेपार गेला आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार, नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे पावसामुळे हवा गुणवत्ता थोडी बरी होती. तरीही हवा गुणवत्ता निर्देशांक १७३ पर्यंत होता. त्यानंतर चढत्या क्रमाने निर्देशाक नोंदवला गेला आहे. २ जानेवारी १९७, ३ जानेवारी २०३ आणिस ३ जानेवारी २१६ इतका सरा-सरी हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला आहे. हवेतील धुलीकणांचे प्रमाण अधिक आहे. पीएम १० हा १६२ तर पीएम २.५ हा १३६ पर्यंत नोंदवला गेला आहे. हे प्रमाण नागरिकांच्या आरोग्यास घातक समजले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT