मुंबईत कुठेही रस्ता ओलांडणे होणार बंद pudhari photo
मुंबई

Mumbai Footpath Clearance-मुंबईतील ३२२ किलोमीटरचे पदपथ मोकळे होणार!

महापालिकेकडून 'पादचारी' प्रथम विशेष मोहीम; पादचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास होणार अधिक सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील पदपथ अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणांपासून मुक्त करून सर्वसामान्यांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आश्विनी भिडे यांनी 'पादचारी प्रथम' अर्थात 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' ही विशेष मोहिम सुरु केली आहे.

या मोहिमेत पहिल्या टप्प्यात मुंबईतील २ हजार ३९२ किलोमीटर ३२२ लांबीच्या पदपथांपैकी किलोमीटरचे पदपथ मोकळे करण्यासाठी निवडण्यात आले आहेत. या मोहिमेचे महापौर रितू तावडे यांनी स्वागत केले असून, अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे पाठबळ लाभणार असल्याचे नमूद केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता 'पादचारी प्रथम' अर्थात 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' ही मोहीम हाती घेतली आहे.

पदपथांवर चालताना विनाअडथळा, सुरक्षित नागरिकांना यावा, यासाठी या मोहिमेतून विशेष कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. त्यात, पहिल्या टप्प्यात ३२२ किलोमीटर लांबीचे पदपथ अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणांपासून पूर्णपणे मोकळे केले जाणार आहेत.

फेरीवाल्यांविषयक प्रश्न सोडवण्यासाठी महापौरांनी आखलेल्या ध्येयाला या 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' मोहिमेतून प्रशासकीय मिळाल्यामुळे मुंबईतील पादचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास आता अधिक सुरक्षित होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT