20 Cats Dead In Mumbai pudhari
मुंबई

20 Cats Dead In Mumbai: मुंबईत तब्बल २० मांजरे मृत अवस्थेत आढळली; पेटाने माहिती देणाऱ्याला ५०,००० रूपयांचे बक्षीस केलं जाहीर

Anirudha Sankpal

20 Cats Dead In Mumbai: मुंबईतील चेंबुर येथील पांजरपोळमध्ये जवळपास २० मांजरे मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मांजरांचे शव हे छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळली आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी केस दाखल करून तपास सुरू केला आहे.

ही सर्व मांजरे अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यांना मोठ्या जखमा झाल्या होत्या. स्थानिक प्राणी मित्र रूबीना पठाण यांनी ही मांजरे अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळली होती. त्यांना ऑगस्ट महिन्यात ही मांजरे आढळून आली होती. त्यानंतर सप्टेंबर ४ ला अजून सहा मांजरे त्याच अवस्थेत आढळून आली आहेत. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी देखील अजून एक मांजर त्याच अवस्थेत आढळून आलं.

पेटा इंडियाने पठाण यांना पोलिसात तक्रार करण्यास मदत केली. त्यानंतर आरसीएफ पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. प्रिव्हेन्शन क्रुएलिटी टुवर्ड्स अॅनिमल अॅक्ट या कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस आता या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याद्वारे हे कृत्य कोणी केलं आहे याला जबाबदार कोण आहे याचा शोध घेतला जाईल. पेटा इंडियाने जे कोण या गुन्हेगारांची माहिती देईल त्याला ५० हजार रूपयाचे बक्षीस देणार आहे असं देखील जाहीर केलं आहे. या बाबतची माहिती PETA India at info@petaindia.org यावर द्यावी माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असं देखील पेटाने सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT