MSRTC  (Pudhari Photo)
मुंबई

MSRTC Salary Arrears: एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढीची थकबाकी खात्यात जमा

सरकारकडून 100 कोटींची तातडीची तरतूद; उर्वरित 110 कोटी लवकरच देण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतनवाढीची प्रलंबित थकबाकी जमा करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिली. निधीच्या कमतरतेमुळे एसटी महामंडळाला ही थकबाकी देण्यात अडचणी येत होत्या, तेव्हा सरकारने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली, असे सरनाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संमतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांसोबतच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. डिसेंबरपासून ही थकबाकी देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, तांत्रिक अडचणी आणि निधीचा अभाव, यामुळे फेब्रुवारीचा हप्ता वेळेवर मिळू शकला नव्हता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

शंभर कोटी मंजूर; उर्वरित 110 कोटी लवकरच

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एकूण 210 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 100 कोटी रुपये सरकारने तातडीने मंजूर केले आहेत. उर्वरित 110 कोटी रुपयेदेखील लवकरच उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. हे केवळ आर्थिक साहाय्य नसून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकारच्या संवेदनशीलतेचे आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे परिवहनमंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT