MHADA Konkan lottery 2026 Pudhari
मुंबई

MHADA Konkan lottery 2026: लवकरच कोकण मंडळाची सोडत; स्वस्त घरांची आशा

अत्यल्प गटाला दिलास

पुढारी वृत्तसेवा

नमिता धुरी

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या किमती बघून निराश झालेल्या अर्जदारांचे डोळे आता कोकण मंडळाच्या सोडतीकडे लागले आहेत. एप्रिलच्या अखेरीस कोकण मंडळाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाला स्वस्त दरात घरे मिळण्याची आशा आहे.

कोकण मंडळातर्फे अडीच हजार घरांची सोडत काढली जाणार आहे. एप्रिलअखेरीस जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यात साधारण एक हजार घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील, असे सांगितले जात असले तरी नेमकी कुठे, किती घरे उपलब्ध असतील याबाबत स्पष्टता नाही. किंमत 20 ते 30 लाखांदरम्यान असेल.

चितळसर मानपाडा येथे अल्प उत्पन्न गटासाठी 200 ते 250 घरे उपलब्ध होतील. बाळकुम येथे मध्यम उत्पन्न गटासाठी 206 घरे असतील. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत खासगी विकासकांकडून काही घरे म्हाडाला उपलब्ध होणार आहेत.

यानुसार ठाणे महानगरपालिकेंतर्गत 5 प्रकल्पांमध्ये 138, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत 3 प्रकल्पांमध्ये 40, नवी मुंबई महानगरपालिकेतील एका प्रकल्पात 21 आणि वसई-विरार महानगरपालिकेतील 2 प्रकल्पांमध्ये 38 घरे उपलब्ध आहेत.

अत्यल्प गटाला दिलासा

कोकण मंडळाच्या सोडतीची जाहिरात एप्रिल महिन्याअखेरीस प्रसिद्ध केली जाईल. यात साधारण 1 हजार घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. या घरांच्या किमती अंदाजे 20 ते 30 लाख असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT